Posts

कै बापूराव पाटील कदम करकाळेकर यांच्या स्मरणार्थ वासंतिक कथायन करकाला येथे संपन्न.

Image
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975 नांदेड ग्रामीण भागात महाराष्ट्रातील असंख्य साहित्यिक करकाला गावात आले असता  व्हीपीके उद्योग समूहचे अध्यक्ष श्री मारोतराव कवळे गुरूजी मार्गदर्शन करताना व उपस्थित जनसमुदाय तसेच सञाचे अध्यक्ष प्रा डाॅ. शंकर विभुते,प्रमुख पाहुणे श्री देवीदास फुलारी,प्रा. महेश मोरे  आयोजक श्री दिगंबर कदम,सहभाग अनुपमा बन,रोहिणी पांडे,रूचिरा बेटकर,राम तरटे यांनी विविध आशयाच्या कथा कथन करून श्रोत्यांना कधी हसवून तर कधी रडवून सोडले.दोन तास कधी संपले कळलेच नाही.  रघुनाथ पाटील कदम आनंद कदम,मल्लू कमळे,साहेबराव कदम,संतोष कदम,उत्तम कदम,व्यंकट पाटील,दिलीप सावंत वमहिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूञसंचालन श्री राम तरटे यांनी केले तर आभार श्री दिगंबर कदम यांनी मानले.

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

Image
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975 नांदेड : मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासह मूलभूत सोयी सुविधांच्या अनुषंगाने खा.डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितशाहा यांची भेट घेऊन चर्चा केली.   मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधीची  विशेष तरतूद करावी अशी मागणी ही यावेळी खासदार गोपछडे यांनी केली आहे . स्वतंत्र भारतामध्ये मराठवाडा तब्बल एक वर्षानंतर स्वतंत्र झाला त्यामुळे मराठवाड्याचा विकास आजपर्यंत म्हणावा तसा झाला नाही.भारतीय स्वातंत्र्याच्या 75 नंतरही मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही.मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न,कृषी सिंचनाचा प्रश्न,रोजगार,उद्योग,शिक्षण, आरग्य,ग्रामीण विकास यासह  अनेक प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत.मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. मराठवाड्याला लागलेला दुष्काळग्रस्ततेचा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी हा कलंक पुसून काढण्यासाठी  मराठवाड्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी.वॉटर ग्रीडचा...

लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा

Image
युवकांचा आधार नांदेड प्रतिनिधी चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर  नांदेड -: जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी लेंडी धरणाला प्रत्यक्ष जाऊन भेट दिली असता धरणाच्या कामकाजाची पाहणी केली पुनर्वसन भागाची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुनर्विग्रस्त गावाची अतिशय दयनीय अवस्था आहे  तिथल्या लोकांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत हे लक्षात घेऊन मी धरणग्रस्तांच्या मागण्याच्या बाजूने आहे असे वचन खासदारांनी दिले जोपर्यंत मावेजा मिळणार नाही तोपर्यंत धरणाचे काम करू दिल्या जाणार नाही धरण झालं पाहिजे याचबरोबर धरणग्रस्त भागातील लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली . सोबत माजी आमदार हनमंत पा बेटमोगरेकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू आ राणगावकर, सर्व सदस्य, पंचक्रोशीतील गावकरी, कार्य कारी अभियंता तिडके,दिलीप पा पांढरे,इ. उपस्थीत होते

किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार

 सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.888817975 बीड-: जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील अन्यायाला वाचा फोडणारे लोकांच्या सख दुखात सदैव तत्पर्य राहून न्याय मिळवून देणारे उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार किरण रवींद्र जावळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जळगाव व कडा कारखाना ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न झाला यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते बापू आहेर,महादेव लोंढे जळगाव उपसरपंच, अमोल सानप ग्रामपंचायत सदस्य, मच्छिंद्र शेंडे शालेय समितीचे अध्यक्ष,अहिराज निकाळजे,सोमीनाथ बनकर,अशोक जाधव,पोपट यादव आदी उपस्थित होते