मोदी सरकार देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे.सरकारचे कामे व आष्टी मतदार संघात मी केलेला विकास घराघरात पोहोचविण्यासाठी नेटाने कामाला लागा - मा.आ.भिमराव धोंडे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.आ.भिमराव धोंडेचे पारगांव जो.येथे गाव चलो अभियान व कार्यकर्ता बैठक 

किरण जावळे जिल्हा प्रतिनिधी बीड
मो.7517033838

बीड-आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान हाती घेतले असून मोदी की गॅरंटी असे सरकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन दुसऱ्या टर्म मध्ये पूर्ण केले आहे.तिसऱ्या टर्मसाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे.बीड लोकसभेसाठी उच्चशिक्षित अशा खा.प्रितमताई मुंडेच उमेदवार असणार आहेत.त्यांना पुन्हा संसदेत पाठवायचे आहे.यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे आहे. तसेच आष्टी मतदार संघात मी देखील तुमच्या मुलांची शिक्षणाची पिढ्यान पिढ्यांची सोय करुन ठेवली आहे. यासह मोठ्या प्रमाणावर रस्ते व विविध विकास कामे केली आहेत.भाजप मधील लोकांनीच टांग मारल्याने पराभव झाला. आता २०२४ साठी पक्ष काय विचार करायचा तो करेल तुम्ही नेटाने कामाला लागा अशा सुचना मा.आ.भिमराव धोंडे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या ते दि.३ फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पारगांव येथे 
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित गाव चलो अभियान व कार्यकर्ता बैठकीत बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे समवेत भाजपा आष्टी तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,भाजपा जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,आरपीआयचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख,सरपंच संभाजी झांबरे,माजी सरपंच त्यात्यासाहेब कदम, सरपंच दादा जगताप, आदी उपस्थित होते.पुढे बोलताना मा.आ.धोंडे म्हणाले की आपल्या जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वात जास्त शिकलेल्या सुशिक्षित खासदार प्रितमताई मुंडे आहेत.परंतु काही जण म्हणतात निधी आला नाही १२०० गाव १५०० वाड्यांना ५ कोटी फंड कसा पुरेल.प्रितमताई उमेदवार असणार आहेत.सरकार देशाच्या प्रगतीसाठी काम करतात.८० कोटी लोकांना सरकार मोफत धान्य देत आहे. महागाई वाढली असली तरी सरकार भाव कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.आष्टी पंचायत समितीत भ्रष्टाचार मोठ्याप्रमाणात सुरू आहे.ते पैसे कुठे जातात ? २० हजार विहरीचा दर आहे.गटविकास अधिकारी यांना बोललो आहे.यात सुधारणा करा नाही तर शेतकरी गोळा करून सर्व काही उखळुन काढु. घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर सुरू आहे पण यासाठी देखील पैसे घेतात अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.गटविकास अधिकारी यांना येईल तो अर्ज ते मंजुर करणे आवश्यक आहे. गत पाच वर्षात रस्ते नाहीत विकास पण झाला नाही.मी तुमच्या मुलांची पिढ्या पिढ्यांची शिक्षणाची सोय केली आहे.मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्र्यांना फोन करून आरक्षण देण्याची विनंती केली त्यावेळेस मिळाले पण टिकले नाही कोणत्याच समाजाला कुणालाच माझा विरोध नाही सगळ्यांना पाठिंबा दिला आहे.पाण्यासारखे स्वच्छ राहायचे मागील निवडणुकीत लोकांनी टांग मारली नेटाने कामाला लागा पुढच काय करायच पक्ष ठरवेल. नरेंद्र मोदी हिरा आहे.मनात शंका न ठेवता उन्नत झालेला देश पाहिचा आहे.यावेळी भाजपा जिल्हा सचिव शंकर देशमुख,भाजप तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के,अशोक साळवे, साहेबराव म्हस्के, लालाभाऊ कुमकर, आदींनी मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन लालाभाऊ कुमकर यांनी केले.यावेळी सरपंच नानासाहेब बांगर, शिवाजी वाहटुळे,ग्रा.प. सदस्य सागर बांगर, पप्पु गिते,रोहिदास बांगर, बबनराव सांगळे, शिवाजी वनवे सर,ॲड. खेडकर,संभाजी जगताप,चेअरमन रघुनाथ शिंदे, विकास वनवे,कैलास डोके,सावळेराम आबा बळे, विनोद कदम,निळकंठ खेडकर,वसंत गिते, विजय वनवे, शेषराव आढाव, विकास ढवळे,राजेंद्र दराडे, पत्रकार बांधव यांच्यासह 
आष्टा गटातील सर्व सुपर वॉरीअर्स,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख,
गण प्रमुख,बुथ समिती, गन व आष्टा ह.ना. गटातील ग्रामस्थ,आदि मान्यवर उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

मराठवाड्यातील विविध विकास प्रश्नांच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्र्यांशी खा.गोपछडे यांची

लेंडी प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या मान्य न झाल्यास प्रकल्पग्रस्तासोबत रस्त्यावर संघर्ष करणार -खासदार रविंद्र वसंतराव चव्हाणआधी मावेजा मग धरणाचे काम सुरू करा

किरण जावळे यांना ऊस संदेश कृषी राज्यस्तरीय पत्रकार